These are the words of appreciation and encouragement for us.
Few of the handpicked feedbacks and testimonials for our work.

कोकणात अंधश्रध्देमुळे आई मुलीला शिक्षणास पाठवत नसे. त्यामुळे दांडेकर दांपत्याने ‘आई’ला प्रथम सुशिक्षीत केले व मगच मुलीला शिक्षणाची गोडी लावली. आपले कार्य खरोखरच स्पृहणीय तर असेल परंतु आपण मनाची श्रीमंती दाखवून पैशाच्या श्रीमंतीवर मात केली. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा!
मा. श्री. उज्ज्वल निकम
दि. १३/१२/२००८

खर्‍या अर्थाने एक आदर्श अध्ययन देणारी शाळा! ह्या प्रकल्पातून अनेक शाळांना नवीन प्रेरणा मिळेल.
मा. डॉ. विजय भटकर,
(ई टी एच रिसर्च लॅब)
दिनांक – २२/२/२०१०

एका कातळावर शाळा उमललेय! या शाळेतील मुले खूप शिकून, खूप काम करुन आत्मविश्वासाने उभी राहोत.
मा. श्री. विलास चाफेकर
दिनांक – १८/१२/१९८७

Lokamanya Tilak Vidyamandir is a Path finding Experiment in school education. This Experiment can show the nation how we can implement the good of universal education for a want only of 110 Billion people resending justly in the 6 lakhs Villages like Chikhalgaon.  I am inspired by the dedication of Renutai & Raja Dandekar who created this Vidyamandir.
Hon. Dr.Vijay Bhatkar,
Father of Indian Super Computer
Date- 22/2/2010

दोन सोज्ज्वळ व समर्पित जीव मनोनिग्रहाने, दीर्घ प्रयत्नाने काय करू शकतात – केवढे मोठे परिवर्तन घडवून आणू शकतात – आधारहीन जीवन जगणाऱ्यांच्या जीवनामध्ये केवढां आनंद भरु शकतात, याचं आजच्या आधिभौतीक जगातलं जिवंत उदाहरण कुठे बघायचे असेल तर लोकमान्य टिळक विद्या मंदीर, चिखलगांव येथे गेल्याशिवाय ते घडणे नव्हे. तेथे जाऊन आपणास ज्या दोन पुण्य आत्म्यांना भेटलं पाहिजे ते म्हणजे सौ. रेणूताई दांडेकर व डॉ. राजा दांडेकर.
मा. पद्मश्री. डॉ. भवरलालजी जैन.
संस्थापक शिल्पकार, जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.
दि. २४ /०४ /२००६

I am deeply impressed to see selfless and dedicated work done by Dr. Raja Dandekar at Chikhalgaon .He has truly demonstrated how we can follow the example of great men. He established education trust and empathy for education to students especially girl students Mrs. Dandekar sacrificed her 28 years. Both Dandekar’s are beyond description. Society needs to help and assist such noble imitative. My best wishes & salute to Dr. Dandekar.
Mr. Ratnakar Gayakwad
Director, MMRDA
Date: 11/04/2008

For More Testimonials,
- Testimonials
- Testimonials