अन्नदान = श्रेष्ठदान
नमस्कार,
मी राजा दांडेकर, लोकसाधना परिवाराचे आपण सर्व हितचिंतक आहात. आपण कसे आहात? आपण आपली काळजी नक्की घेत असाल. मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो की, या कोरोना विषाणूच्या विळख्यातून आपण सर्व लवकरात लवकर बाहेर येऊ आणि एकमेकांना भेटू
गेली अनेक वर्ष आपली संस्था ग्रामीण भागातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी अविरत प्रयत्नशील आहे हे आपण जाणताच.
या संकटाच्या काळात चिखलगाव आणि आजूबाजूच्या किन्हळ, देवके, मळे व अन्य काही गावातील अपंग, विधवा, निराधार आणि हातावर पोट असणाऱ्या गरजू लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे. या गरजू लोकांना रेशन तर्फे तांदूळ मिळतात परंतु अन्य अत्यावश्यक गोष्टी मिळत नाहीत. आपण सर्वांनी मिळून या सर्व गावातील लोकांसाठी एक मदतीचे किट तयार करायचे ठरवले आहे ज्यामध्ये:
1. तूर डाळ 1 किलो
2. तेल 1 लि.
3. साखर 1 किलो
4. चहा 200 ग्रॅम
5. हळद 100 ग्रॅम
6. तिखट 250 ग्रॅम
7. मोठा बिस्कीट पुडा
8. कांदे 1 किलो
9. बटाटे 1 किलो
10. लसूण 250 ग्रॅम
11. मीठ 1 किलो
अश्या गोष्टी समाविष्ट आहेत. अश्या एका किट साठी आपल्याला सुमारे रु. 500/- खर्च येणार आहे.
आपण शक्य तितक्या जास्त कुटुंबांपर्यंत ही मदत पोचविणार आहोत आणि आवश्यकता भासल्यास भविष्यात सुद्धा आपण अशा प्रकारे जीवनावश्यक किट पुरविणार आहोत.
आपल्या संवेदना आणि सहवेदना या जागृत करूया आणि या आपल्या गरजू बहिण भावंडांच्या पाठीशी उभे राहुयात. आपण आपली मदत संस्थेच्या बँक खात्यावर पाठवू शकता त्यासाठी संस्थेच्या बँक खात्याचा तपशील खालील प्रमाणे:
A/c details of Sanstha Khate:
A/c Name: Lokmanya Public Charitable Trust
A/c no: 145510210000216
Bank: Bank of India
Branch: Dapoli
IFSC: BKID0001455
आपल्या भक्कम सहकार्याची अपेक्षा करतो. सर्वांनी घरी राहा आणि काळजी घ्या.
आपला,
डॉ. राजा दांडेकर
संपर्क: +919422431275 / +917499825998
www.loksadhana.org
contact@loksadhana.org
PS – PLEASE SEND THE PAYMENT DETAILS TO KAIVALYA DANDEKAR ON +919404961757 (WHATSAPP) OR ON contact@loksadhana.org
॥ एकमेकां सहाय्य करु..
कोरोना संकट पार करु..॥
🤝🏻👍🏻🤝🏻👍🏻🤝🏻सप्रेम नमस्कार,
आपण सुखरूप असाल अशी आशा करतो. कोरोनाच्या…
Posted by Loksadhana Chikhalgaon on Monday, 11 May 2020
Posted by Loksadhana Chikhalgaon on Wednesday, 29 April 2020
॥ एकमेकां सहाय्य करु..
कोरोना संकट पार करु..॥
🤝🏻👍🏻🤝🏻👍🏻🤝🏻
सध्या आपण सर्वचजण या संकटाचा सामना करत आहोत. हीच वेळ आहे…Posted by Loksadhana Chikhalgaon on Friday, 24 April 2020
॥ माझाही खारीचा वाटा..🐿️🙏🏻॥
सर, माझ्या 9 वर्षाच्या मुलीला कु. पायलला ही पोस्ट वाचायला दिली. यावर ती मला म्हणाली, "पप्पा…Posted by Loksadhana Chikhalgaon on Tuesday, 21 April 2020