लोकसाधना –

प्रोजेक्ट सृजन – कल्पना स्पर्धा

लोकसाधनेचं काम शिक्षण या मूलभूत पायावर आधारलेलं आहे. शिक्षण हे समग्र ग्रामविकासाचा केंद्रबिंदू म्हणून ठेऊन त्याआधारे इतर अनेक क्षेत्रात लोकसाधना काम करीत आहे. लोकसाधनेच्या माध्यमिक शाळेची इमारत आपण पाहिली आहेच. या शाळेमध्ये विषयवार वर्गरचना आहे. शिक्षणातील अनेक अभिनव उपक्रम या वास्तूमध्ये केले जातात ज्यामध्ये अनुभवमंडप, कुतूहल कोपरा, अभिव्यक्ती फलक अशा अनेक उपक्रमांचा सामावेश आहे. या वास्तूने अनेक मुलांची भविष्य उज्वल केली आहेत.

 

या वास्तूचे नूतनीकरण करण्याचा लोकसाधनेचा विचार आहे. या साठी अनेक स्तरावर प्रोजेक्ट सृजन काम करणार आहे ज्यामध्ये आर्थिक उभारणी, प्रत्यक्ष नियोजन, आणि संपूर्ण काम पूर्णत्वास नेणे अश्या पायऱ्या आहेत. यामध्ये अजून एक महत्वाची पायरी आहे ती म्हणजे शाळेच्या वास्तूचे नूतनीकरण करताना कल्पक व सृजनात्मक पद्धतीने करणे आणि त्यासाठी वास्तू व त्या वास्तू मध्ये चालणारे विविध उपक्रम नव्याने विचारात घेणे याचा समावेश आहे.

आपण लोकसाधक म्हणून लोकसाधनेचा एक भाग आहात. आपल्या साठी एक आगळावेगळा उपक्रम घेऊन येत आहोत. प्रोजेक्ट सृजन अंतर्गत एक छोटासा प्रयत्न.

 

१. तुम्हाला काय करायचं आहे?

# वास्तू कल्पना:

वास्तूचे नूतनीकरण करताना वास्तूच्या/वर्गांच्या बाहेरील व आतील सजावटी साठी कल्पना सुचविणे. आपण सुचवीत असलेली कल्पना चित्र स्वरूपात मांडता आली तर आणखी उत्तम. आपण आपली कल्पना मोजक्या शब्दात, मुद्देसूद मांडावी आणि त्यासाठी #प्रोजेक्ट सृजन #वस्तू कल्पना असे नमूद करावे.

#उपक्रम कल्पना:

वर्गाच्या रचनेप्रमाणे वर्गामध्ये घडणाऱ्या उपक्रमांना देखील खूप खूप महत्व आहे. आपण कोणते उपक्रम इयत्ता 1 ली ते 4 थी, 5 वी ते 8 वी, 9वी व 10वी आणि 11वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेता येतील याबाबत कल्पना सुचवाव्या. यासाठी उपक्रम मांडताना उपक्रमाची संपूर्ण कल्पना, कृती, आवश्यक साहित्य हे सर्व नमूद करावे. उपक्रमाचे विवरण चित्र रूपात केल्यास आणखी उत्तम. आपली कल्पना मोजक्या शब्दात, मुद्देसूद मांडावी आणि त्यासाठी #प्रोजेक्ट सृजन #उपक्रम कल्पना असे नमूद करावे.

# लोकमान्य टिळक विद्यामंदिर चिखलगाव – शालेय इमारतीची माहिती 

इमारत तपशील : 

  • एकूण वर्ग खोल्या 10
  • सभागृह 1
  • कार्यालय 2
  • शिक्षक कक्ष 1

२. आपल्या कल्पना कधी पर्यंत पोचवाव्या?

 या स्पर्धेसाठी आपण आपल्या कल्पना दि. ३०/०४/२०२० पर्यंत पोचवू शकता.

३. स्पर्धेची प्रक्रिया काय आहे?

आपण पाठविलेल्या कल्पनांची निवड डॉ. राजा दांडेकर आणि रेणू दांडेकर व निवड समिती करेल. वास्तू कल्पना आणि उपक्रम कल्पना या दोनही मधून प्रत्येकी तीन कल्पना निवडल्या जातील. निवड झालेल्या कल्पना मांडणाऱ्याना लोकसाधनेतर्फे पुरस्कृत केले जाईल. तसेच प्रोजेक्ट सृजनच्या तयार होणाऱ्या रिपोर्ट मध्ये या कल्पना समाविष्ट केल्या जातील. ज्यांच्या कल्पनांची निवड होणार नाही त्यांनी निराश होऊ नये कारण त्यांच्या कल्पना देखील या प्रोजेक्टच्या माहिती पत्रकात नमूद होतील. ज्या कल्पनांची निवड झाली आहे त्या कल्पनांच्या कल्पकांना दि. ०१ ऑगस्ट २०२० म्हणजेच संस्थेच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमास निमंत्रित करून सन्मानित केले जाईल.

आपण सर्वांनी या संधीचा उपयोग करून लोकसाधनेच्या या कामामध्ये आपले प्रत्यक्ष योगदान द्यावे.

यासाठी खाली दिलेला form भरून आपल्या कल्पना word किंवा pdf format मध्ये अपलोड कराव्यात. Message Section मध्ये तुम्ही आपल्या कल्पनेची थोडक्यात माहिती दिली तर उत्तम.

 

प्रोजेक्ट सृजन – कल्पना स्पर्धा Form

Please write your idea in short here. (आपल्या कल्पनेची माहिती इथे थोडक्यात लिहा.)